Friday, August 26, 2016

सुशासन

लोकशाहीच्या बळकट संस्था, अत्यंत पारदर्शी, प्रभावी, प्रागतिक शासनव्यवस्था

असं म्हणतात की पूर्वी जग हजार वर्षात बदलायचं तेव्हढं नंतर शंभर वर्षात, नंतर तेव्हढंच १० वर्षात बदलायला लागलं. आता तितकाच बदल फक्त एका वर्षात होतो आहे. तंत्रज्ञान बदललं, समाज बदलला, व्यापार बदलला, उद्योग बदलला, अगदी लहान मुलांची खेळणी देखील बदलली परंतु शासनव्यवस्था काही बदलायला तयार नाही. अजूनही ब्रिटीश सरकारनं घालून दिलेल्या वाटेनंच आपण चाललो आहोत. वास्तविक सध्याची पिढी "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" ह्या विचारांची, नो नॉनसेन्स वाली, स्वत: चं म्हणणं असणारी, ते म्हणणं मांडणारी. मात्र असं असलं तरी त्या पीढीला या लोकशाहीत व्यक्त व्हायला मिळत नाही. शासनव्यवस्थेत, देश-राज्य कसं चालवायचं या पध्दतीत अत्यंत क्रांतिकारक, आमूलाग्र बदल, सुधारणा करायला पाहिजेत. त्यात बदल केला नाही तर बाकी फार बदलून काही होणार नाही.
नागरिक, राजकीय पक्ष आणि शासन व्यवस्था / प्रशासन यांचा परस्पर संबंध काय?
आजची व्यवस्था निर्माण होईपर्यंत तीत काय काय बदल होत गेले? आणि ते का झाले?
नागरिक, राजकीय पक्ष आणि शासन व्यवस्था / प्रशासन या तिन्ही घटकातले संबंध कसे बदलत गेले?
आणि आजच्या आधुनिक काळात, भविष्याचा वेध घेणारी शासन व्यवस्था नेमकी कशी असली पाहिजे?
या प्रश्नांची उत्तरे शोधताना आम्हाला काही सूत्रे सापडली. शासन कारभारातील नागरिकांची भूमिका, शासनाची आपल्या नागरिकांप्रीत्यर्थची जबाबदारी आणि या सर्वासाठी असलेले राजकीय पक्ष, त्यांची रचना आणि कार्यपद्धती यावर विचार करायला आम्हाला प्रवृत्त केले.
आणि या विचार-मंथनातून आम्हाला आपली शासन व्यवस्था सुधारायचा कार्यक्रम मिळाला. तो आम्ही इथे मांडत आहोत.

No comments:

Post a Comment

Pages

My Blog List