Showing posts with label पायाभूत सुविधा. Show all posts
Showing posts with label पायाभूत सुविधा. Show all posts

Friday, August 26, 2016

जैवविविधता

जैवविविधतेच्या वैभवाने बहरलेला महाराष्ट्र !

जैवविविधतेच्या वैभवाने बहरलेला महाराष्ट्र !

महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती टिकेल, बहरेल यासाठी लोकांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न
महाराष्ट्र राज्य आधुनिकीकरण, औद्योगिक प्रगती, माहिती तंत्रज्ञान क्रांती यामध्ये अग्रेसर असला तरी, आपल्या निसर्गदत्त जैविक संपत्तीचे जतन करण्यात फारच मागे, किंबहुना नापासच झाला आहे. भौतिक संपत्ती, पैसे कमावण्याच्या नादात आपण झाडे, वनस्पती, पक्षी, जलचर यांचे आयुष्य नष्ट करत चाललो आहोत. आधुनिक होणे म्हणजे निसर्गाशी दुरावा घेणे नव्हे. आधुनिकीकरणाबरोबरच आपण निसर्गाशी जवळीक साधायला हवी. स्थानिक जैविक संपत्तीचे जतन व संवर्धन हे परिसरात राहणारे लोकच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात हे कुणालाही पटेल. आता कायद्याने स्थानिक लोकांना वनसंपत्तीवर भक्कम हक्क मिळाले आहेत. या कायद्यामुळे जैविक संपत्तीचा शहाणपणाने, टिकाऊ पद्धतीने वापर करण्याची जबाबदारी स्थानिकांवर आली आहे. जुन्या चुका दुरूस्त करून भविष्यातील निसर्ग वैभवाने नटलेल्या महाराष्ट्राचे स्वप्न आपण सर्वांनी पहायला पाहिजे.

प्रश्नाचं स्वरूप


महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेलगतच्या अरबी समुद्रापासून ते पूर्वेच्या डोंगराळ प्रदेशांपर्यंत शेतजमिनी, जंगले, यांमध्ये पसरलेली झाडे, पशु, पक्षी, कीटक व पाणीसाठ्यांमधल्या वनस्पती आणि प्राणीमात्र हे सर्व म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जैवविविधता. या जैवविविधते मधल्या प्रत्येक घटकाचे निसर्गामध्ये एक विशिष्ट स्थान असते. हे सर्व जीव-जंतू निसर्गाचे चक्र अबाधितरित्या चालवायला मदद करतात. पण त्यांच्या कार्यभारामध्ये जर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला तर याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होतो. तसेच यापैकी एक जरी जाती-प्रजाती नष्ट झाली तर नैसर्गिक चक्र बिघडते.
जैवविविधतेच्या दृष्टीने पश्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जगातील समृद्घ जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. भारतात सापडणार्‍या उच्च दर्जाच्या २७% वनस्पती (४,००० ते १५,००० जाती) इथे दिसतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात बघायला मिळतात. फुलपाखरांचे ३३४ प्रकार इथे आहेत. तसेच बरेच दुर्मिळ प्राणी देखिल पश्चिम घाटात आहेत. पक्ष्यांच्या १६ जाती ज्या जगात दुसरीकडे कुठेही सापडणार नाहीत त्या इथे आहेत. जगाच्या इतर भागांमधून दुर्मिळ किंवा नाहीश्या झालेल्या जवळजवळ ३२५ प्राण्यांच्या जाती इथे सापडतात. तसेच महाराष्ट्रात ७२० कि.मि. ची किनारपट्टी आहे, ज्यावर ८०,००० मच्छीमार कुटुंबांचा रोजगार चालतो. आपल्या या किनारपट्टीपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला हे तालुके सागरी जैवविविधतेने संपन्न आहेत. इथे ३६७ सागरी वनस्पती व वन्यजीव प्रजाती आढळून येतात. यापैकी अनेक वर्ग १ मधील संरक्षित प्रजाती आहेत.
महाराष्ट्राची जैवविविधता ही नैसर्गिक समृध्दी खाण आहे. आपल्याच हितासाठी, निसर्गात आढळणार्‍या या प्रत्येक जीव-जंतू, प्राणी आणि वनस्पतींच्या विविध जाती-प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगले, कुरणे, शेती, जलप्रदेश, नद्या यामधून सजिवांच्या विविध जाती, त्यामधील जनुकीय विविधतेसह जपलेला असतो. परंतु हाच जैवविविधतेचा वारसा, ही संपत्ती आज धोक्यात आल्याचे चित्र दिसते. जगाच्या पाठीवरची वाढती लोकसंख्या आणि प्रत्येकास आर्थिक महासत्ता बनण्याचा लागलेला ध्यास यामुळेच जैविक विविधतेचा र्‍हास होत आहे.

असं का होतं?


आज माणसाची औद्योगिकीकरण, शहरीकरणाच्या रेट्यात निसर्गात आढळणार्‍या विविध जाती-प्रजातींशी स्पर्धा सुरू आहे. यामुळे माणसाचा निसर्गामध्ये हस्तक्षेप वाढत चालला आहे आणि आपल्या राज्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पुरवण्यासाठी अवैध जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे प्राण्यांची नैसर्गिक घरे (habitat) आणि अन्न साखळी नष्ट होत आहे. माणूस स्वतःच्या हव्यासापोटी वन्यजीवांच्या परिसरावर अतिक्रमण करत चालला आहे. यामुळे आता वाघ, बिबटे हे अन्न आणि पाणी शोधण्यासाठी गाव-वस्तीत येऊ लागले आहेत. यामुळे माणसांच्या, त्यांच्या संपत्तीला, पाळीव प्राण्यांच्या जीवनाला धोका तर पोचतोच आणि त्याबरोबर हे वन्यप्राणी स्वतःचा जीवालाही मुकतात.
पाश्चिमात्य पद्धतीचे अनुकरण केलेले जीवनमान, गतिमान जीवनशैलीमुळे, आपल्या "वापरा व फेकून द्या" (use and throw) या वाढत चाललेल्या वृत्तीमुळे वस्तूंचे महत्व जाणून त्या पुन्हा पुन्हा वापरणे बंद झाले आहे. जमिनीवरचा कचरा, नद्या-समुद्रांमधले सांडपाणी यांमुळे तिथल्या वनस्पती, प्राणी, मासे आणि त्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नाहीशा होत चालल्या आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी स्थानिक भारतीय लोकांचे निसर्ग-संपत्तीवरचे सर्व हक्क हिरावून घेतले, व ही संपत्ती स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी वापरून घेतली. देशातली वनसंपत्ती काडीमोलाने उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याची कायदा-व्यवस्था लावून दिली. हेच पुढे चालत राहिले, व आपले लोक आपल्याच वन संपत्तीची किंमत करणे आज विसरून गेले आहेत.
स्थानिक लोकांचा आवाज दाबला जाऊन उपटसुंभ्या उद्योजकांच्या बाजूने कायदे करणार्या सरकारी कारभारामुळेच आज ठिकठिकाणी राज्याच्या जैविक संपत्तीचा र्‍हास झाला आहे व होतो आहे.

काय करायला हवं?


  • राज्यात स्थानिक शासन पातळीवर जैविक संपत्ती संरक्षणाचे कायदा-अधिकार, कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा ठोठावण्याची तरतूद अशी संपूर्ण व्यवस्था करायला हवी.
  • नदी, समुद्र प्रदूषण पूर्णपणे रोखण्यासाठी कारखान्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सक्ती केली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या उद्योग-धोरणाप्रमाणे तेथील जैविक संपत्ती संरक्षणाचे कायदे - नियम हे वेगवेगळे केले गेले पाहिजेत. काही जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने जैविक संपत्ती संरक्षण करायचे असेल तिथे विशिष्ट प्रकारच्या कारखान्यांना मनाई केली जाईल. उदा. जागतिक दर्जाच्या सौंदर्यपूर्ण ७२० कि.मी. च्या कोकणकिनारपट्टीवर कोणतेही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बांधण्यास मनाई केली जाईल.
  • वने, जंगले, प्राणीजीवनात व्यत्यय न आणता, त्यांचा परिसर सुरक्षित ठेऊन मगच आपण आपला भौतिक विकास केला पाहिजे. आपण त्यांना सुरक्षित ठेवले तर त्यांचा आपल्याला अनेक प्रकारे चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो.
  • अन्नसाखळीतील सर्वांत वरच्या पातळीवरच्या वाघासारख्या प्राण्यांचे संरक्षणासाठी त्यांची आवश्यक नैसर्गिक घरे (habitat) जपायला हवी. त्याचबरोबर या प्राण्यांना लागणारे त्यांच्या अन्नसाखळीतील खालच्या पातळीवरचे असलेले प्राणी व त्या प्राण्यांना लागणारे खाद्य (गवत, वनस्पती) या सगळ्याचे संवर्धन केले पाहिजे. वाघासोबतच विविध वनस्पती, इतर प्राणी, पक्षी यांचे अधिवास टिकून राहतील यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. म्हणून व्याघ्र प्रकल्पासारखे प्रकल्प योग्य रीतीने आणि मोठ्या प्रमाणावर राबवायला पाहिजे. तसेच प्राण्यांचे एका जंगलातून दुसर्यान जंगलात जाण्यासाठी ठराविक मार्ग असतात. माणसांच्या अतिक्रमणामुळे ते हरवले आहेत. ते मार्ग शोधून त्यांचा पुनःनिर्माण केला पाहिजे.
  • यापुढे त्यांचे भवितव्य व माणसाचे अस्तित्व हे एकमेकांशी निगडित आहे हे आपण ओळखले पाहिजे. आपण आपले हितसंबंध निसर्गाशी घट्ट जोडले पाहिजेत व त्यांच्या बरोबरचे आपले सहजीवन आपण अंगवळणी पाडले पाहिजे.
  • वनस्पतींच्या संवर्धनास लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे व त्या वनस्पतींचे पारंपारिक ज्ञानाचा वारसा पुढे नेला पाहिजे. आपल्या शेकडो वर्षांच्या वैद्यकशास्त्र परंपरेला धरून आज आपण दुर्मिळ औषधी वनस्पतींचा उपयोग वाढविला पाहिजे.

महत्वाच्या कल्पना


  • परिसरातील जैविक संपत्ती जोपासण्यासाठी स्थानिकांना कायदा-अधिकार
  • त्या त्या जिल्ह्यातील विशिष्ट जैविक संपत्ती लक्षात घेऊन तेथील उद्योग-धंद्यांचे नव्याने धोरण आखणी
  • प्राणी, वनस्पती जिथे आहेत त्या जागेवर त्यांचे संवर्धन
  • जागतिक दर्जाचे "सह्याद्री जैव-विविधता केंद्र
  • लोणारला जैव विविधता संशोधन केंद्र

कार्यक्रम


स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना

जैवविविधतेचे स्थानिक पातळीवर नियोजन करणे गरजेचे आहे. जैवविविधता कायदा २००२ व जैवविविधता नियम २००४च्या अंतर्गत प्रत्येक स्थानिक संस्थेला एक जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. या कायद्यानुसार स्थानिक जैवविविधता व त्याच्या उपयोगांची नोंदणी हे या स्थानिक समित्यांद्वारे केले जाईल. या कायद्यात जैवविविधतेच्या संवर्धनाच्या तरतूदी आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट केली जाईल.

निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन

वनाचे व तिथल्या जैवविविधतेचे संवर्धनासाठी व नागरिकांमध्ये वनाचे महत्त्व कळण्यासाठी निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे स्थानिक रोजगार देखील निर्माण होतील.

पर्यावरण

निघाल्याशिवाय तो प्रकल्प पुढे जाणार नाही. आणि आपल्या परिसरात कुठला प्रकल्प येऊ द्यायचा हा निर्णय स्थानिकांचाच असेल.
उदाहरणार्थ - एखाद्या जागी जर खारफुटीचं क्षेत्र असेल तर ते क्षेत्र खरंतर नैसर्गिकरीत्या पूर रोखायला मदत करतं. पण एखाद्या प्रकल्पासाठी ते क्षेत्र काढून टाकणं आवश्यक असेल तर त्या पूरपरिस्थितीला तोंड द्यायची त्या भागाची तयारी असायला हवी. ते टाळण्यासाठी तिथल्या नागरिकांना या क्षेत्राचं संवर्धन करणं आवश्यक वाटू शकतं. इथे कोणत्याही विकासकामाला परवानगी देताना या गोष्टीचा विचार केला जाईल आणि मगच नागरिक निर्णय घेतील.
तसेच, डोंगरांवरची झाडं तोडायची का नाही हा निर्णय पूर्णपणे स्थानिकांचा असेल.

मोजा म्हणजे सापडेल!

मोजणी केली म्हणजे आपण अक्षरश: किती पाण्यात आहोत हे आपल्या लक्षात येतं ! आपण काय आहोत, कुठे आहोत हे निश्चित कळल्यावर आपण कुठे जायचं हे ठरवता येईल.
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पर्यावरण मंडळ अथवा केंद्र असेल. हे मंडळ लोकसहभागाद्वारे त्यांच्या पर्यावरणाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. या आढव्यामधून ते सामूहिकरीत्या आपला पर्यावरण सद्यस्थिती अहवाल बनवू शकतील. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण, तसंच पर्यावरणाबद्दलची इतर मानकं या अहवालांतर्गत मोजली जातील, त्यांचा आढावा घेतला जाईल. असा पर्यावरण विषयक अहवाल बनविण्यासाठी लागणारी तांत्रिक मदत राज्य सरकारचं प्रदूषण मंडळ करेल. त्याच बरोबर असे अहवाल सर्व ठिकाणी बनवले जावेत म्हणून अर्थसंकल्पामध्ये तशी सोयही करतील.
हा अहवाल कोणत्या मुद्द्यांवर बनवला जाईल हे सर्वतोपरी तिथल्या नागरिकांनी ठरविलेले असेल.
या अहवालाबरोबरच, नागरिक त्यांच्या शहरासाठी / नगरासाठी काही पर्यावरणीय उद्दिष्ट ठरवतील.

पर्यावरण

पर्यावरण संतुलन

माणसाने एकट्यानेच सार्‍या पर्यावरणाचे संतुलन बिघडवू नये म्हणून...

माणूस हा पर्यावरणाचाच एक भाग आहे. माणसाच्या बदलत्या रहाणीमानामुळे निसर्गाचे चक्र बदलतं आहे. माणसानं पर्यावरणाचं संतुलन न बिघडवता, पर्यावरणाशी जुळवून घेऊन रहाणं गरजेचं आहे. ही जबाबदारी कोण्या एका मंडळाची किंवा शासनाची नसून, प्रत्येक नागरिकाची आहे. आजपर्यंत माणूस फक्त निसर्गाकडून घेत आला, आता त्यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!

प्रश्नाचं स्वरूप


कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, गाड्यांसाठी इंधन जाळल्यानं होणारा धूर, चुलीसाठी जाळलेल्या लाकडाचा धूर, या सर्वांमुळे हवा दूषित होते. या प्रदूषणामुळे माणसांना श्वसनाच्या विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. सांडपाणी, कारखान्यातून निघणारं रसायनमिश्रित पाणी, तसंच शेतात वापरली जाणारी रासायनिक खतं हे सर्व पाणी­प्रदूषणास कारणीभूत ठरतात. यामुळे नद्या व समुद्रात प्रदूषण होतं. अनेक प्रकारच्या वस्तू समुद्रात फेकण्यात येतात. तसंच, जमिनीवर कचरा टाकल्यामुळे जमीन दूषित होते आणि अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीतलं क्षारांचं प्रमाण वाढतं. परिणामी जमीन नापीक होते. याच प्रकारे आपलं भूजलही दूषित होतं. गाड्यांचे हॉर्न, भोंगे, फटाके, लाउडस्पीकर इत्यादी ध्वनी प्रदूषण करतात. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य या दोन्हीवर परिणाम होतो. रक्तदाब वाढतो आणि हृदयरोगाला आमंत्रण मिळते.

असं का होतं?


पर्यावरण म्हणजे एकमेकांवर प्रभाव पाडणारे जैविक, भौगोलिक व सामाजिक घटक (पहा आलेख क्र. १). या सर्व घटकांमध्ये एक संतुलन असते. प्रत्येक घटकाला आपल्या मर्यादा माहित असतात. या मर्यादा ओलांडणे पर्यावरणाच्या नियमात बसत नसल्याने कोणीही याचे उल्लंघन करत नाही. जेंव्हा हे सर्व घटक एकमेकाचा आदर करून राहतात, तेंव्हा निसर्गाचं संतुलन राखलं जातं, नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होत नाही.
माणसानं, त्याच्या हव्यासापायी या नैसर्गिक सीमारेषा ओलांडल्या आहेत. माणूस या इतर घटकांचा उपयोग करून घेण्यापेक्षा, केवळ उपभोग घेत आहे. या अविचारी¸ उपभोगी वृत्तीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होतो आहे. यामुळे माणूस स्वत:च्याच विनाशाकडे वाटचाल करू लागला आहे.
अठराव्या शतकापासून पर्यावरण संतुलन झपाट्यानं बिघडतं आहे. वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, शहरीकरण, वाढते उद्योग, जीवनशैलीतील बदल, वाढता खनिज इंधनांचा वापर, शेतीसाठी रसायनाचा अती वापर, यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीत घट होते. तसेच हवा, पाणी व जमिनीच्या प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतात.

काय करायला हवं?


  • प्रत्येक नागरिकानं, जागरूकपणे आपल्या परिसरावर देखरेख ठेवायला हवी.
  • एखादा भाग विकसित करताना, त्याच्या क्षेत्रातल्या नैसर्गिक साधन-संपत्तीच्या क्षमतेचा विचार केला गेला पाहिजे.
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे देखरेख, तांत्रिक सहाय्य आणि कायदे-नियम सुचवण्यासाठी राहायला हवं.
  • प्रत्येक औद्योगिक केंद्रानं आपापलं प्रदूषण स्वत:च नियंत्रणात ठेवायला हवं. यासाठी जे काही प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य लागेल ते सर्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरवेल.
  • जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
  • स्थानिक पातळीवर लोकसहभागातून देखरेख करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं.
  • अनेक ठिकाणच्या जागा प्रदूषणामुळे आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे मोडकळीला आलेल्या असतात. अशा जागा ओळखून, शोधून त्याचं संवर्धन करायला हवं. म्हणजे माळीण गावासारख्या दुर्घटना टाळता येतील.

महत्वाच्या कल्पना


  • स्थानिक साधन-संपत्तीवर स्थानिकांचा अधिकार
  • पर्यावरण राखण्यात स्थानिकांचा थेट सहभाग
  • पर्यावरणाच्या काही मोजक्या निर्देशांकाचं सतत मोजमाप

कार्यक्रम


स्थानिक साधन-संपत्तीवर स्थानिकांचा अधिकार

ज्या गावात, नगरात किंवा शहरात नैसर्गिक साधन-संपत्ती, उदा. जंगल, खाण, तलाव इ. असेल, त्या नैसर्गिक साधनांवर स्थानिकांचा अधिकार असेल. या साधनाचे काय करायचं, त्याचा वापर कसा आणि किती करायचा हे ठरवण्याचा अधिकार तिथल्या नागरिकांचाच असेल. स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या मार्फत हा अधिकार तिथल्या नागरिकांना बजावता येईल.

पर्यावरण राखण्यात स्थानिकांचा थेट सहभाग

आपला परिसर कसा रहावा याची संपूर्ण जबाबदारी तिथले स्थानिक नागरिक घेतील. परिसरात एखादी नदी असेल तर त्या नदीचं संवर्धन कशा प्रकारे व्हायला हवं यावरही नागरिकांचं लक्ष असेल. नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळून त्या शहरातल्या, गावातल्या सर्व नैसर्गिक साधन-संपत्तींच्या संवर्धनाचं स्वामित्व स्वीकारतील.
आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे विकास प्रकल्प येण्याआधी त्यांच्या दुष्परिणामांचा विचार करूनच ते स्वीकारले जातील. या दुष्परिणामांवर तोडगा निघाल्याशिवाय तो प्रकल्प पुढे जाणार नाही. आणि आपल्या परिसरात कुठला प्रकल्प येऊ द्यायचा हा निर्णय स्थानिकांचाच असेल.
उदाहरणार्थ - एखाद्या जागी जर खारफुटीचं क्षेत्र असेल तर ते क्षेत्र खरंतर नैसर्गिकरीत्या पूर रोखायला मदत करतं. पण एखाद्या प्रकल्पासाठी ते क्षेत्र काढून टाकणं आवश्यक असेल तर त्या पूरपरिस्थितीला तोंड द्यायची त्या भागाची तयारी असायला हवी. ते टाळण्यासाठी तिथल्या नागरिकांना या क्षेत्राचं संवर्धन करणं आवश्यक वाटू शकतं. इथे कोणत्याही विकासकामाला परवानगी देताना या गोष्टीचा विचार केला जाईल आणि मगच नागरिक निर्णय घेतील.
तसेच, डोंगरांवरची झाडं तोडायची का नाही हा निर्णय पूर्णपणे स्थानिकांचा असेल.

मोजा म्हणजे सापडेल!

मोजणी केली म्हणजे आपण अक्षरश: किती पाण्यात आहोत हे आपल्या लक्षात येतं ! आपण काय आहोत, कुठे आहोत हे निश्चित कळल्यावर आपण कुठे जायचं हे ठरवता येईल.
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पर्यावरण मंडळ अथवा केंद्र असेल. हे मंडळ लोकसहभागाद्वारे त्यांच्या पर्यावरणाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. या आढव्यामधून ते सामूहिकरीत्या आपला पर्यावरण सद्यस्थिती अहवाल बनवू शकतील. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण, तसंच पर्यावरणाबद्दलची इतर मानकं या अहवालांतर्गत मोजली जातील, त्यांचा आढावा घेतला जाईल. असा पर्यावरण विषयक अहवाल बनविण्यासाठी लागणारी तांत्रिक मदत राज्य सरकारचं प्रदूषण मंडळ करेल. त्याच बरोबर असे अहवाल सर्व ठिकाणी बनवले जावेत म्हणून अर्थसंकल्पामध्ये तशी सोयही करतील.
हा अहवाल कोणत्या मुद्द्यांवर बनवला जाईल हे सर्वतोपरी तिथल्या नागरिकांनी ठरविलेले असेल.
या अहवालाबरोबरच, नागरिक त्यांच्या शहरासाठी / नगरासाठी काही पर्यावरणीय उद्दिष्ट ठरवतील.

इंटरनेट उपलब्धता

दूरसंचार सुविधा

आधुनिक संपर्क क्रांतीचा लाभ मिळावा म्हणून राज्यभर इंटरनेट, मोबाईल द्वारे डॅटा कनेक्टिव्हीटी

तंत्रज्ञान क्रांतीमुळे आज माणसाला पूर्वी उपलब्ध नसलेल्या विकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता माहिती आज पोचविता आणि मागविता येऊ शकते. इंटरनेट, स्मार्टफोन यामुळे माणसाच्या आर्थिक व सामाजिक विकासात वेगाने मोठी भर पडत आहे. माणूस जगभरातील ज्ञान, कला-कौशल्ये, तंत्रज्ञान शिक्षण यांची पाहिजे तितकी माहिती स्वतःच्या वापरासाठी मिळवू शकत आहे. या क्षेत्रात सतत होत असलेल्या सुधारणांमुळे या सुविधा कमीत कमी किंमतीत व जास्तीत जास्त लोकांना वापरता येऊ शकत आहेत. परंतु आपल्या देशातल्या आर्थिक धोरणे व परवाना धोरणांमुळे या सुविधा खेडोपाडी पोचायला गरजेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. केंद्र शासनाच्या वेळखाऊ प्रक्रियांमुळे महाराष्ट्र राज्यातली अनेक गावे, खेडी या स्वस्त, फायदेशीर तंत्रज्ञान सुविधांपासून वंचित राहत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने योग्य ते धोरणात्मक बदल करून घेणे आवश्यक आहे.

प्रश्नाचं स्वरूप


आजघडीला जगातल्या सगळ्या प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये टेलिकॉम क्षेत्रातल्या सुविधा आणि त्या सुविधांचा तिथे राहणार्‍या जास्तीत जास्त लोकांनी केलेला वापर हे प्रकर्षाने दिसून येते. इस्त्रायल देशाचेच उदाहरण घेतलं तर, जितकी जास्तीत जास्त लोकं या सुविधांद्वारे एकमेकांशी जोडलेले असतील तितके समाजाच्या, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी फायद्याचे आहे.
भारतात १९९१ पासूनच केंद्र शासन पातळीवर टेलिकॉम या क्षेत्रात धोरण सुधारणा केल्या गेल्या. दुर्दैवाने गेल्या १० वर्षांमध्ये खाजगी कंपन्यांमधील स्पेक्ट्रम लिलाव स्पर्धांमधील गोंधळ, राजकीय पक्षनेत्यांचे भ्रष्टाचार, सरकारी शुल्क भरावे लागू नये म्हणून खाजगी कंपन्यांनी कागदोपत्री आपला महसूल कमी दाखविणे अशा प्रकारांमुळे या क्षेत्रात अनागोंदी कारभार माजला आहे. या सर्व प्रकारांमुळे टेलिकॉम सेवा ग्राहकांपर्यंत पोचण्याच्या ऐवजी सेवा कंपन्या व सरकारी परवाना विभाग यांच्या वादात अडकून पडल्या आहेत.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सर्वांत जास्त मोबाईल, इंटरनेट ग्राहक आहेत. भारताच्या एकूण इंटरनेट ग्राहकांपैकी १६% म्हणजे ३८७ लाख ग्राहक हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये आपण हे पाहतोच आहोत. या हाय स्पीड इंटरनेटमुळे आपण पाहिजे तेव्हा काही क्षणांत जगाशी जोडले जात आहोत. पूर्वी नव्हत्या एवढ्या वस्तू व सेवा आज आपल्याला बसल्या जागी मिळत आहेत. शहरांमधल्या कंपन्यांची व्यावसायिक, औद्योगिक गणिते देखील यामुळे बदलली आहे. किंबहुना राज्यात अनेक ठिकाणी, विशेषकरून दुर्गम भागांमध्ये, ज्या ठिकाणी रस्ते पोहचले नाहीत अशा ठिकाणी या सुविधांची निकड अधिक आहे, तसं असूनही तिथल्या लोकांना मात्र या सुविधांचा फायदा आज मिळत नाही.
मोठ्या शहरांमध्ये या सेवा देणार्‍या कंपन्यांची सेवा द्यायची तयारी असली तरी केबल टाकण्यासाठीची परवानगी घेण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. स्थानिक प्रशासन संस्थेने परवानगी दिली तरी त्याचे भरमसाट शुल्क लावले जाते (एक कि.मी. फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी मुंबई महानगरपालिका रु. ८० लाख एवढे शुल्क आकारते). या अडचणींमुळे मोठ्या शहरांत देखील सर्वदूर ही सेवा पोचू शकत नाही. दुर्गम भागात किंवा छोट्या नगरांमध्ये कंपनीला खर्च निभावण्याइतपत उत्पन्न मिळेल की नाही याची शास्वती नसल्यामुळे तो खर्च अंगावर घ्यायला या कंपन्यांची तयारी नसते. त्याचबरोबर आज प्रत्येक कंपनीला आपले स्वत:चे केबलचे जाळे उभे करावे लागते. एका कंपनीला दुसर्‍या कंपनीने टाकलेले जाळे वापरता येत नाही.
राज्याच्या प्रत्येक कोपर्‍यात विकासासाठी जसे रस्ते, रेल्वे, वीज या दळणवळणाच्या सुविधा अत्यावश्यक आहेत, तशीच किंबहुना त्याहूनही अधिक टेलिकॉम ही सेवा आवश्यक आहे. लोकांना जोडण्याबरोबरच अनेक नवीन आधुनिक रोजगार निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. याकडे राज्य शासनाचे विशेष लक्ष दिले नाही हीच आपल्या चिंतेची गोष्ट आहे.

असं का होतं?


भारताने १९९० मध्ये स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे दूरसंचार क्षेत्रात खाजगी आणि परदेशी कंपन्या उतरल्या आणि त्यांनी आधीच्या असलेल्या सरकारी कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढत चांगलेच अहमहमिकेचे वातावरण निर्माण केले. याच काळांत मोबाईल, लो स्पीड चे डायल-अप इंटरनेट अशा सुविधा शहरांमध्ये आपल्याला मिळू लागल्या. या क्षेत्रात सतत तंत्रज्ञान सुधारणांमुळे स्पर्धा वाढत गेली. परंतु देशात, राज्यांमध्ये त्या अनुशंगाने आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा केल्या गेल्या नाहीत. टेलिकॉम सेवांच्या मनोर्‍यांसाठी (mobile tower) सर्वांत जास्त वीज लागते. ही वीजच तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात तयार होत नाही. वीजेचा तुटवडा असलेल्या राज्यात या टेलिकॉम सेवा पुरविण्यामध्ये कंपन्यांना अडथळे येतात आणि ग्राहकापर्यंत सेवा पोहचते तेव्हा ती महाग झालेली असते. देशातल्या एकूण ४ लाख मोबाईल मनोर्‍यांपैकी ७०% मनोर्‍यांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. यांना विजेचा गरजेसाठी डिझेल वर अवलंबून रहावे लागते. साहजिकच परिणामी ग्राहकांना सेवांसाठी जास्त किंमत मोजावी लागते.
स्थानिक प्रशासनांचे केबल कंपन्यांसाठीचे धोरण अनिश्चित आणि त्रोटक आहे. प्रमाणाबाहेर शुल्क लावण्याची प्रथा या कंपन्यांना मागे खेचते.
दूरसंचार सेवा देण्यासाठी स्पेक्ट्रम च्या लिलावांमधील भ्रष्टाचार यामुळे केंद्र सरकारच्या धोरण निर्णयांमध्ये बदल केले गेले. यांमुळे दूरसंचार सेवा पुरवणार्‍या कंपन्याची आर्थिक गणिते पार कोलमडून पडली व त्यांच्या अस्तित्वासमोरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले दिसते.

काय करायला हवं?


महाराष्ट्र राज्याचा वेगाने आर्थिक सामाजिक विकास घडवायचा असेल तर, राज्यातील प्रत्येक गावामध्ये, खेड्यांमध्ये कमीत कमी किंमतीच्या, वापरण्यास सुलभ अशा टेलिकॉम सुविधा पोचवायला हव्यात. ज्याचा प्रत्यक्ष व्यावहारिक फायदा शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, कारागिर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हायला हवा. जी गावे, खेडी आज रस्त्यांनी, रेल्वे ने शहरांना जोडली नाहीत, ती या टेलिकॉम सेवेमुळे कमी खर्चात जोडली जातील. शहरांशीच नाही तर, जगाशी जोडले गेल्याने माहिती, ज्ञान, व्यापाराच्या अमाप संधी त्यांना उपलब्ध होतील. आजच्या काळाला धरून इ-शाळा, इ-शेती, इ-आरोग्य, इ-बँकिंग क्षेत्रातील सुविधा ग्रामीण जनतेला उपलब्ध होतील.
नजीकच्या काळामध्ये दूरसंचार क्षेत्राची वाढ ही २०% वेगाने होणार आहे, तर या क्षेत्रातील नोकरीच्या संधी दरवर्षी ७% वेगाने वाढतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या क्षेत्राचे मोल ओळखून राज्य शासनाने योग्य ती पावले वेळीच उचलली पाहिजेत.
स्पेक्ट्रम उपलब्ध करून देणे, दुर्गम भागात या सेवा पोचवाव्यात म्हणून कंपन्यांना योग्य त्या सवलती देणे, तसेच केबलचे जाळे टाकता यावे म्हणून धोरणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाचे स्वतंत्र टेलिकॉम मंडळ निर्माण करायला हवे. या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कंपन्यांना एकमेकांचे जाळे तसेच अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरण्यासाठी त्यांनी एकमेकांना सहकार्य करावे म्हणून हे मंडळ काम करेल. तसेच स्थानिक प्रशासन संस्थांना विश्वासात घेऊन हे मंडळ काम करेल.
महाराष्ट्र राज्य शासनाने यासाठी सर्वप्रथम पुरेशी वीजनिर्मिती होण्यासाठी वीजनिर्मिती क्षेत्रात सुधारणा हाती घेतल्या पाहिजेत. केंद्र शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर विसंबून न राहता, राज्य शासन पातळीवर स्वतंत्रपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रत्येक मनोर्‍यासाठी लागणारी वीज तिथेच निर्माण करण्यास परवानगी दिली पाहिजे.

महत्वाच्या कल्पना


  • महाराष्ट्र राज्य शासनाचे टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांच्या परवानासंबंधी केंद्रापासून वेगळे असे स्वतंत्र धोरण.
  • खासगी कंपन्यांमधील स्पर्धा टिकवून, प्रकल्प मंजुरी वेगाने होण्यासाठी राज्य पातळीवर स्वतंत्र मंडळ.

कार्यक्रम


  • टेलिकॉम क्षेत्राच्या वेगवान विकासासाठी कंपन्यांचे अतिनियंत्रण टाळून राज्य शासन सहाय्यकाची व नियमकाची भूमिका घेईल.
  • महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र टेलिकॉम विभागाची स्थापना केली जाईल ज्यांतर्गत ऑप्टिकल फायबर टाकणे इत्यादी तांत्रिक गोष्टींसाठीची मान्यता इ. निर्णय चटपट घेतले जातील.
  • या विभागांतर्गत ३५ जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तंत्रज्ञान विषयक प्रशासकीय मार्गदर्शन दिले जाईल.
  • महाराष्ट्र राज्य अंतर्गत जागतिक व्यापार संघटनेच्या आधारे परदेशी कंपन्यांबरोबर टेलिकॉम प्रकल्पांच्या वाटाघाटी.

मोकळ्या जागा

निवासी भागांमध्ये सुंदर मोकळ्या जागा...

शहरी आयुष्याच्या रोजच्या धकाधकीमधून मोकळा श्वास घ्यायल्या बागा, क्रिडांगणं, उद्यानं, वाटिका, हिरवळ असलेल्या टेकड्या, नद्या, सरोवरे, तलाव, चौथरे, ऍम्फी थिएटर

शहरातल्या सुंदर, मोकळ्या, प्रशस्त, राखीव जागा म्हणजे शहराचा श्वास. झपाट्याने वाढणार्‍या शहरीकरणाच्या रेट्यामुळे मिळेल त्या जागेत बांधकाम करणे आणि पैसे कमावणे अशी चढाओढ चालू आहे. यामुळे आधीच्या असलेल्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे केली जातात, आणि तिथे राहणार्‍या लोकांची विसाव्याची ठिकाणे हिरावली जातात. आज लोकांना आपण राहतो तिथून सहज चालत जाता येईल अशा अंतरावर, मुद्दाम वेळ काढून एकत्र येण्याकरता, स्वच्छ आणि सुशोभित हक्काच्या मोकळ्या जागा असणे अतिशय गरजेचे आहे.

प्रश्नाचं स्वरूप


शहरांमधले वाढते धकाधकीचे जीवन, गावे ओस आणि शहरांमध्ये भाऊगर्दी, नोकरीसाठी आलेले आणि मग इथेच स्थायिक होऊन जाणार्‍या लोकांसाठी भरमसाठ घरे बांधायची यांमुळे शहरातल्या उरल्या सुरल्या मोकळ्या जागा काबीज केल्या जातात. आणि मग दिसायला लागतात ती सिमेंटची जंगलं. सदनिकांची, लोकांची आणि त्यांच्या वाहनांची गर्दी यामुळे शहरातले जीवन कोंडमार्‍याचे झाले आहे. लहानांना खेळायला, तरूणांना सामाजिक कार्यक्रमांसाठी, ज्येष्ठ लोकांना निवांतपणासाठी त्यांच्या त्यांच्या निवासी भागांमध्ये राखून ठेवलेल्या हक्काच्या अशा जागा दुर्मिळ होत चालल्या आहेत. माणूस हा समाजप्रिय असल्याने त्याला समवयस्कांबरोबर एकोप्याने समाजजीवनाचा आनंद घेण्याची इच्छा निसर्गतःच असते. आज धावपळीच्या रहाट्गाडग्यामुळे तो या सहज आनंदास रोज मुकतो आहे.
लहान मुले बाल्यसुलभ खेळ खेळायला न मिळाल्याने ते मानसिकरित्या आक्रमक होत आहेत. लहानपणापासून खेळीमेळीतून खिलाडू वृत्ती तयार होते, बर्‍याच गोष्टी शिकल्या जातात. तरूणांच्या वैचारिक देव-घेव मधून अनेक कल्पना, ज्ञानोपासना, समाजहित प्रकल्पांची सुरूवात होते. परंतु आज मुले अंगणे, क्रीडांगणे नाहीत म्हणून यांत्रिक खेळांमध्ये अडकत आहेत आणि त्यांचे मानसिक दुर्बल, शारिरीक स्थूल होत आहेत. तरूणांची समाजबांधिलकी लोप पावत चालली आहेत. सुसंवाद कमी झाल्याने ज्येष्ठांच्या एकटेपणाच्या, नैराश्याच्या समस्या वाढत आहेत.
रोजच्या कामांच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी कुटुंबेच्या कुटुंबे सुट्टीत वा सुट्टी काढून शहरांबाहेर निसर्गरम्य वातावरणात जाण्याचा पर्याय शोधतात.

असं का होतं?


पैसे कमावण्याच्या आधुनिक संधी, शहरी चकमकत्या दुनियेचे आकर्षण यांमुळे शहरांच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक लोकांनी येथे बस्तान बसविले. टोलेजंग इमारती बांधताना शहराचे विकास नियोजन पुरते मोडकळीला आले. शहरांच्या विकास आराखड्यात कागदावर तरी ठिकठिकाणी मोकळ्या जागा राखून ठेवल्या होत्या. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत, शहरीकरणाचा वेग इतका जास्त होता की, हळू हळू विकास आराखड्यातल्या मोठ्या मोठ्या आरक्षित जागासुद्धा पैसा व राजकारणाच्या जोरावर बांधकामासाठी लाटल्या.
सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा त्याच्या रोजच्या नोकरी धंद्याच्या व्यापात गुरफटलेला असतो. लोकांचा एकत्रित आवाज ऐकून त्यांच्यासाठी योजनाबद्ध बांधकामे करवून घेणारे शहरांचे स्थानिक शासनही तेवढे सक्षम नाही. लोकांना कर भरूनही चार घटका निवांत बसायला घरांच्या आजूबाजूला पुरेशा बागा, उद्याने, ऐसपैस बैठकीची ठिकाणे मिळत नाहीत.

काय करायला हवं?


आपल्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागा मोकळ्याच राहतील याचा लोकांनी आग्रह धरला पाहिजे. स्थानिक शासनव्यवस्थेस भाग पाडून या जागा सुशोभित राहतील, त्यांचा आनंद जास्तीत जास्त लोकांना घेता येईल अशा बनविल्या पाहिजेत. केवळ जमिनीच नाही तर, आपल्या भागातील नद्या, नाले, तलाव हे ही स्वच्छ, सुशोभित केले जातील, जास्तीत जास्त लोकांना नौकाविहार आणि अशा गोष्टींसाठी वापरले जातील अशी तजवीज केली पाहिजे.
शहरातून वाहणार्‍या नद्यांच्या दोन्ही कडांना हिरवळ, बसण्याच्या सोयी, उपहारगृहे अशा सौंदर्यदृष्टीचा शहराच्या विकास आराखड्यात अंतर्भाव केला गेला पाहिजे. खाजगी उद्योग, परदेशी गुंतवणूकीच्या सहाय्याने स्थानिक शासन हे सहजच करू शकते. शिवाय, यामुळे नदीलगतच्या जागांना चांगली किंमत येऊन तिथल्या अर्थव्यवस्थेसही मोठा हातभार लागणार आहे. शहराचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच लोकांचे समाजजीवन समृद्ध करण्यासाठी ठिकठिकाणी खास या मोकळ्या जागा विकसित केल्या गेल्या पाहिजे.
  • प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात मोकळ्या जागा राखून ठेवायला हव्यात.
  • या मोकळ्या जागांचे स्थानिक जनतेने नियोजन करावे; त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे हे ठरवून त्या जागा विकसित कराव्यात.
  • शहरातल्या नद्या, नाले, तलाव यांच्या सौंदर्यदृष्टीपूर्ण सुशोभिकरणात खासगी व परदेशी गुंतवणूकीची शहर योजना.
  • महाराष्ट्रात ५,००० क्रिडांगणे, मोकळी मैदाने विकसित करावी, जी आहेत ती राखावी.

महत्वाची कल्पना


  • महाराष्ट्रात अशा मोकळ्या जागा राखून, त्यावर विविध प्रकारचे सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक-राजकीय आणि क्रीडाविषयक उपक्रम होतील, होत रहातील म्हणून एक विशेष मोहीम राज्यभर राबवणं.

कार्यक्रम


हजारो वर्षांपासून माणूस मोकळ्या जागांवर वाढला, मोठा झाला, शहाणा झाला. मग ते शेतावर असो, जंगलात असो की डोंगर-टेकड्यांवर. म्हणून आजही माणूस चार भिंतींमधून बाहेर पडून कुठे बागेत, कुठे मोकळ्या मैदानावर किंवा काहीच नाही जमलं तर रस्त्यावर जाऊन उभा रहातो. जिथून त्याला आकाश दिसेल. आकाश पहाणं ही माणसाची स्वाभाविक प्रेरणा आहे. महाराष्ट्रात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोकळ्या जागा शोधणं, त्या विकसित करणं, त्यासाठी स्थानिक जनता, तिथल्या संस्था ह्यांची मदत घेणं, त्या जागा जोपासणं याची एक मोठी चळवळ उभी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात ह्या निमित्तानं "मोकळ्या जागांची मोकळी, खुली संस्कृती" यातून विकसित होईल.
ह्या मोकळ्या जागांकडे "वाया जाणारं साधन" असं मुळीच बघू नये. अशा मोकळ्या जागा माणसाला मोकळं करतात, त्याच्यातील सृजनशीलता वाढवतात, माणसाला अनंद देतात, त्यातून सामाजिक स्वास्थ्य टिकतं-वाढतं, मोकळी हवा लोकांना मिळते. अशा मोकळ्या हवेचं "मूल्य" काय? लोकांना एकत्र यायला, एकत्र खेळायला, एकत्र सांस्कृतीक कार्यक्रम करायला, विचारांची देवाणघेवाण करायला ह्यातून संधी मिळते. हा खूपशा सामाजिक समस्या आणी रोगांवरचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. एक स्वस्थ, सुदृढ, सृजनशील समाज उभा करायचा तर अशा मोकळ्या जागांची फार आवश्यकता आहे.
एका मोकळ्या मैदानावर बघा -
  • मुलं रोज खेळतील, खेळण्याची संस्कृती रुजेल, फोफावेल.
  • सकाळ-संध्याकाळ लोक चालतील, पळतील, व्यायाम करतील.
  • हास्य-क्लब, योगासनं, छंदवर्ग, चित्रकला, कवायती, स्पर्धा अशा गोष्टी तिथं होतील.
  • सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील.
  • राजकीय सभा होतील, त्यानं लोकशाही बळकट होईल.
  • आजी-आजोबा फिरतील, चालतील, गप्पा मारत बसतील.
  • ह्या मोकळ्या जागेमुळे आसपास मोकळी हवा खेळेल, तिचा उपयोग हजारो लोकांना होईल.
  • मोकळ्या जागांच्या विकासामुळे शहराच्या एकूण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल, अनेक रोजगार नव्याने निर्माण होऊ शकतील.
  • शहराच्या पर्यटन दर्जात वाढ होईल.
  • सामाजिक, सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढीस लागून समाजमूल्यांचे जतन होईल.
  • वैचारिक देवाण-घेवाणीमुळे सुरक्षित वातावरण मिळेल, गुन्हेगारीला आळा बसेल.
  • ठिकठिकाणच्या मोकळ्या जागा विकसित केल्याने शहरातल्या लोकांचे मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारून त्यांच्या कार्यकुशलतेमध्ये लक्षणीय वाढ होईल.

मलनिस्सारण

सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन

विकेंद्रीत व्यवस्थापनातून सांडपाण्याचा आणि पूराच्या पाण्याचा पुनर्वापर
लोकांचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी मैलापाण्याचे योग्य पद्धतीने निस्सारण होणे गरजेचे आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी मुख्य प्रवाहात आल्यामुळे आणि पावसाच्या स्वच्छ पाण्यात मिसळल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. आपल्या परिसरातील नद्या, नाले, तलाव स्वच्छ रहावेत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर करण्याची पुरेशी सुविधा पुरवायला हवी. पावसाच्या पाण्याची साठवण करून आणि पूराच्या पाण्याच्या व्यवस्थापनातून उपलब्ध होणार्‍या अतिरिक्त पाण्याचा उपयोग करून घ्यायला हवा.

प्रश्नाचं स्वरूप


सांडपाणी

पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणार्‍या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.
आज राज्यात अनेक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया न करता स्थानिक जलसाठ्यांमध्ये सोडले जाते, ज्यामुळे पाण्याचे साठे दूषित होतात.
सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे शौचालयातून, घरगुती वापरातून व कारखान्यातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितरित्या एकत्रित करून, त्याची साठवण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून त्याची नीट विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यावर त्याचा पुनर्वापर करता येतो आणि नागरिकांचे आरोग्यही सुधारते. त्याबरोबरच परिसरातल्या नद्या, नाले व तलाव यांचे संरक्षण होते, तिथला निसर्ग अबाधित राहतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ही गरज कायमच अपुरी पडत असते. या अपुर्याल सोयींमुळे विकसनशील देशांत अंदाजे १८ लाख लोकांचा अतिसारामुळे दर वर्षी मृत्यू होतो १ , पैकी ९०% ५ वर्षाच्या आतली मुले असतात.
महाराष्ट्रात्ल्या शहरांत व गावांमध्ये बरीच घरे व वस्त्या अशा आहेत जिथे घरात किंवा त्यांच्या परिसरात शौचालयाची सोय नाही. यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते. याने मुख्यत: लहान मुले आजारी पडतात. शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्यामुळे किंवा अव्यवस्थित शौचालयांमुळे मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण कमी होते. इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्सच्या अभ्यासानुसार अस्वच्छ शौचालयांमुळे २% ते ३% शाळेतील मुले, मुख्यत: बालवाडीतील मुले, युरिनरी ट्रॅक्टच्या आजाराने व पोटाच्या विकाराने त्रस्त असतात. मुलांपेक्षा मुलींमध्ये हे त्रास जास्त होतात २ .
राज्याच्या ग्रामीण भागात घराघरातले सांडपाणी उघड्या गटारींद्वारे, कोणतीही प्रक्रिया न करता, नदीत, तलावात किंवा नुसते जमिनीवर सोडले जाते. ग्रामीण भागांत सांडपाण्याच्या प्रक्रियेची कोणतीही सोय नाही. काही भागांमध्ये जरी सेप्टिक टॅंक असले तरी वेळोवेळी देखरेख होत नाही आणि बहुतांश वेळा त्यात जमा केलेले सांडपाणी तसेच्यातसे नाल्यात सोडले जाते. यामुळे त्या भागांत आरोग्याला अपायकारक स्थिती निर्माण होते. डास होतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिकच वाढते. पावसाच्या पाण्यामुळे नाले तुडूंब भरून वाहतात आणि हे नाल्याचे पाणी व पावसाचे पाणी आजूबाजूला पसरून अख्खा परिसर दूषित होतो.
राज्यातील शहरी भागांत सांडपाणी बंद गटारींद्वारा प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत वाहून न्यायची सोय असते. पण खरी समस्या ही प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी असते. सकाळच्या वेळेस या प्रकल्पांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार असतो आणि सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे बहुतांश सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जाते. शहरांमध्ये सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण कमी असल्याकारणाने बरेच लोक रस्त्यावर शौचास जातात ज्यामुळे दुर्गंधी पसरते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. राज्यातील सगळ्या शहरांमध्ये महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण देखील कमी आहे.
काही कारखान्यांमध्ये त्यांच्या आवारात निर्माण होणार्‍या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय नसते आणि ते तसेच नद्यांमध्ये किंवा जमिनीवर सोडले जाते. तसेच झोपडपट्टींमधील सार्वजनिक शौचालयातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. हे प्रदूषित पाणी नदीनाल्यांमध्ये सोडल्यामुळे फक्त पाणीसाठेच नाही तर प्रवाहाच्या खालच्या बाजूस राहणार्‍या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. थोडक्यात, नदीच्या स्वच्छ गोड्या पाण्याच्या बदल्यात आपण नद्यांना सांडपाणी परत देतो. हे योग्य नव्हे!

पावसाळी पाणी आणि पूर

प्रत्येक शहर, वस्ती आणि गावाची स्वत:ची नैसर्गिक पाणी निचरा करण्याची सोय असते. पण अनेक दशकांपासून वाढत्या शहरीकरणामुळे या नैसर्गिक निचरा करण्याच्या सोयी नष्ट झाल्या आहेत. बर्‍याचशा नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत किंवा ते कचरा व राड्या-रोड्याने भरले गेले आहेत. नाल्यांवर अतिक्रमण केल्यामुळे पाण्याचे प्रवाह अरूंद होतात व थोड्याशा पावसात देखील पाणी रस्त्यांवर वाहू लागते. जेथे सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत तेथे सांडपाणी सर्रासपणे नाल्यांमध्ये सोडले जाते. मोठा पाऊस आल्यावर पावसाच्या पाण्याला नाल्यातून वाट मिळत नाही आणि ते सांडपाणी मिश्रित पावसाचे पाणी घरांत शिरते आणि पूरसदृष परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.
नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. या पारंपारिक नैसर्गिक पाणी निचरा प्रणालींचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत गरजेचे आहे.
पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन हा पायाभूत सुविधांचा एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये पावसाचं पाणी साठवले आणि जिरवले जाते. पावसाचे पाणी आणि सांडपाणी हे एकत्र वाहून नेणे चुकीचे आहे. न्यायालयाने पालिकांना दिलेल्या आदेशानुसार, पावसाळी पाण्याची आणि सांडपाण्याची गटारे वेगळी असावीत. यामुळे सांडपाणी जमिनीत मूरून भूजल प्रदूषित होत नाही.

असं का होतं?


असा समज आहे की शौचालये बांधल्यावर उघड्यावर शौच करणे बंद होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुधारेल. हे खरं आहे, पण प्रश्नाची ही अर्धीच बाजू आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या कार्यक्रमांतर्गत राबविले जाणारे उपक्रम हे शौचालय बांधण्यावर जोर देतात, पण सांडपाण्याच्या विल्हेवाटीची कोणतीही सोय करत नाहीत. घरांसमोर असलेली उघडी गटारे बहुतांश वेळेला कचरा किंवा गाळ साठल्यामुळे तुंबलेली असतात. गटारींमध्ये साचलेले सांडपाणी सामाजिक स्वास्थ्यास हानिकारक असते. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साधारण ३.७ कोटी जनता सांडपाणी वाहून नेण्याच्या सुविधेपासून वंचित आहे. उरलेल्या घरांपैकी ज्यांच्याकडे ही सुविधा आहे, तेथे अर्ध्याहून अधिक सांडपाण्याची गटारे उघडी आहेत.
सांडपाणी हे तीन प्रकारचे असते - sullage (आंघोळ, स्वयंपाकघर, धुणीभांडी), sewage (शौचालयात वापरलेले पाणी) आणि effluent (कारखान्यांमधील पाणी). हे तीन्ही प्रकारचे सांडपाणी एकत्र होत असल्यामुळे सांडपाणी शुद्धिकरण प्रक्रियेच्या यंत्रणेवरचा भार वाढतो आणि प्रक्रिया करण्याचा खर्च देखील वाढतो. तीन वेगवेगळ्या स्त्रोतांमधून निर्माण होणार्याभ सांडपाण्यावर प्रक्रिया करावे लागणारे तंत्रज्ञान हे वेगवेगळे असते.
भारताच्या महानगरांमध्ये वापरल्या जाणार्‍या एकूण पाण्यापैकी जवळजवळ ८०% पाण्याचे सांडपाण्यात रुपांतर होते. या सगळ्या निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. याचे कारण असे की हे सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा जास्त असते व ५०% हून अधिक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय तसेच नदीत सोडले जाते.

काय करायला हवं?


सांडपाण्याचे व्यवस्थापन हे कमी न लेखता प्राधान्य देऊन त्याचा पाठपुरावा करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. हे न केल्याने आपल्या नद्यांना आज गटाराचे स्वरूप आले आहे. छोटे नाले देखील प्रदूषित झाले आहेत. उघड्या, तुंबलेल्या गटारांमुळे डासांना वाव मिळून मलेरिया, डेंग्यु, इ. सारख्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी १००% सांडपाण्यावर १००% प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आपल्याला ठेवावे लागेल, आणि ते गाठण्यासाठी कंबर कसावी लागेल.
सांडपाणी व्यवस्थापनाला 3R (रिड्युस, रिसाइकल आणि रियुझ – कमी करा, इतरत्र उपयोग करा आणि पुन्हा वापरा) या तत्वाच्या आधारावर प्रोत्साहन द्यायला हवं. ही सर्व प्रक्रिया विकेंद्रित करावी लागेल.
शक्यतो सांडपाण्याचा उगम जिथे होतो तिथेच प्रक्रिया होईल, जेणे करून यंत्रणेवरचा ताण आणि खर्च कमी होईल हे पहावे लागेल. प्रक्रिया करताना शक्यतो नैसर्गिक पद्धतींचा अधिक प्रमाणावर वापर आणि प्रक्रिया केल्यानंतरच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तत्व स्वीकारावे लागेल. असे करता यावे म्हणून गृह निर्माण उद्योगाला सज्ज व्हावे लागेल; औद्योगिक क्षेत्राला सुद्धा आपली जबाबदारी नेटाने पेलावी लागेल.
हे कसं करावं, कुठलं तंत्रज्ञान वापरावं यावर जगात खूप संशोधन चालू आहे. नव-नवीन उपाय सुचवले जात आहेत. सांडपाण्याचा उपयोग करून वीज व गॅस निर्मिती, खत, असे बहुउद्देषिय प्रकल्पांचा विचार होत आहे. कमी पाणी वापरणारी शौचालये तसेच इतर उपकरणे बाजारात येत आहेत. या सर्वाचा आढावा घेऊनच आपले नियोजन करायला हवे.
सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी व या प्रक्रियांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करावे लागतील.

महत्वाच्या कल्पना


  • विकेंद्रित सांडपाणी आणि पूरपाणी व्यवस्थापनावर भर
  • सांडपाण्याच्या आणि पूरपाण्याच्या पुनर्वापराचा प्रयत्न
  • सांडपाणी व्यवस्थापनातून उद्योग निर्मिती आणि रोजगार

कार्यक्रम


विकेंद्रित सांडपाणी व्यवस्थापन

जास्त क्षमता असलेल्या केंद्रीकृत सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांपेक्षा विकेंद्रित व कमी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प अधिक प्रभावशाली असतात. अशा विकेंद्रित प्रकल्पांमुळे मुळे स्थानिकांकडे सांडपाणी प्रक्रियेची जवाबदारी राहते आणि या कामात त्यांचा सहभाग वाढतो. म्हणूनच विकेंद्रित पर्यावरणीय (ecological) सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला हवे.
विकेंद्रित व्यवस्थापनामुळे रोजगार निर्मितीचे नवीन मार्ग आणि पर्याय उपलब्ध होऊ शकतात. कमी वस्तीच्या आणि दूरस्त भागांमध्ये व निवासी इमारती आणि विश्रामगृहांमध्ये विकेंद्रित सांडपाणी व्यवस्था उभारणी व देखरेख केल्याने रोजगारास प्रोत्साहन मिळेल, मुख्यतः ग्रामीण भागात जेथे रोजगारांचा अभाव आहे तिथे.
औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्याचे एकत्रिकरण टाळावे, ज्यामुळे प्रक्रियेवर होणारा खर्च कमी होईल. उद्योगांनी त्यांच्या कारखान्यात निर्माण होणार्या औद्योगिक सांडपाण्याची सोय त्यांच्याच परिसरात करावी. आणि प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा स्वत:च्याच परिसरात वापरावे. जे कारखाने प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदी किंवा मोकळ्या जागेत सोडतील अशांना दंड करण्यात यावा. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च हा प्रकल्प उभारतानाच विचारात घेतला जावा.

सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे एकत्रीकरण टाळणे

घराघरातून येणार्‍या सांडपाण्याचा पुनर्वापर त्या परिसराच्या आवारात झाला पाहिजे. लोकसहभागाद्वारे स्पष्टपणे चर्चा झाल्यावर, sewage आणि sullage पद्धतशीररित्या वेगळे केले जावे. त्यासाठी योग्य असा तांत्रिक पाठिंबा पुरवला जावा. अशा प्रकारे प्रत्येकजण आंघोळ, स्वयंपाकघर, धुणी-भांडी यांमधून निर्माण होणार्‍या सांडपाण्याचा योग्य असा वापर करु शकेल (उदा., बाग किंवा परसबागेसाठी, गाड्या धुवायला, शौचालयात फ्लशिंग साठी, शेतीसाठी). यामुळे नैसर्गिक स्वच्छ पाण्याचा वापर कमी होऊन पाण्याचा अपव्यय टळेल आणि तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणेवरचा भार देखील कमी होईल.
कमी पाणी वापरणारे व शौचालयातून बाहेर पडणार्‍या पदार्थांचे (मल व मूत्र) विघटीकरण करणार्‍या आधुनिक शौचालयाच्या वापराला प्राधान्य दिला जावे. या प्रकारचे वर्गीकरण फायदेशीर ठरते कारण केवळ मूत्रात एकत्रित केलेल्या मल-मूत्रापेक्षा कमी जंतू असतात, त्यामुळे ते शुध्द करण्याची प्रक्रिया सोपी असते. विष्ठेला कमपोस्टने निर्जंतुक केल्यावर खत म्हणून वापरण्यात येते. आधुनिक शौचालय ही काळाची गरज आहे. कारण, इतके वर्ष आपण जे नैसर्गिक संसाधन वाया घालवत आहोत त्याचा सामाजिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

सांडपाणी निरिक्षण समिती व लोकशिक्षण अभियान

विभाग पातळीवर एक समिती बनवण्यात यावी ज्यात नागरिक, स्थानिक कार्यकारी संस्था, पर्यावरण अभियंता आणि पर्यावरण शास्त्रज्ञ यांचा सहभाग असेल. प्रत्येक सांडपाणी प्रकल्प यंत्रणा, उद्योग आणि घरगुती सांडपाण्याचे परिक्षण दर तीन महिन्यांनी केले जाईल.
फक्त शौचालय आणि सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बांधून उपयोग नाही पण त्याचा योग्य वापर सुध्दा झाला पाहिजे. यासाठी ही समिती वेगवेगळ्या प्रकारचे लोकजागृती उपक्रमही राबवेल. सांडपाण्याचा सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेपर्यंतचा प्रवास, वेगवेगळ्या जनजागृती उपक्रमातून शौचालयाच्या स्वच्छतेचे महत्च, सफाई सेवेची आणि कार्यकारणीचे संख्यात्मक आणि परिमाणात्मक निरिक्षण आणि वरील नमूद केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ती केल्यावर नैसर्गिक पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण हे सांडपाणी व्यवस्थापनाची शेवटची पायरी असेल.

दुहेरी किंवा तिहेरी पाणी वितरण प्रणालीचा वापर करणे

समुद्रकिनारी वसलेल्या भागात दुहेरी किंवा तिहेरी पाणी वितरण प्रणाली पध्दतीचा वापर करावा आणि बाकीच्या भागात दुहेरी पाणी वितरण प्रणालीचा वापर करावा. हॉंगकॉंग मधली दुहेरी पाणी वितरण प्रणाली गेले ५० वर्ष कार्यरत आहे. हॉंगकॉंग शहर आपल्या ७ दशलक्ष लोकसंख्येपैकी ८०% लोकांना समुद्राचे पाणी शौचालयात वापरण्यासाठी पुरवते. त्यामुळे नगरपालिकेचा शुध्द पाण्याचा वापर २०% ने कमी होतो. हॉंगकॉंग विमानतळावर तिहेरी पाणी वितरण प्रणाली वापरली जाते. त्यात शुध्द पाणी, समुद्राचे पाणी आणि आंघोळ, स्वयंपाक आणि धुणेभांड्यांसाठी वापरलेले पाणी वापरले जाते ज्यामुळे नगरपालिकेच्या पाण्याची ५०% बचत होते ३ .

नैसर्गिक पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन

सध्याच्या परिस्थितीत, सांडपाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया यंत्रणा अपूरी असल्यामुळे महाराष्ट्रातले अनेक नदी, नाले व तलाव प्रदूषित झाले आहेत. या नदी, नाले व तलावांना पुन्हा वाहतं करण्यासाठी सर्वात प्रथम सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्याआधी त्याच्यावर १००% प्रक्रिया होणे आवश्यक आहे. नद्या, नाले, तलाव व पाणथळ जमिनी यांचे टप्प्याटप्प्याने पुनरुज्जीवन केले गेले पाहिजे. पाणीसाठे स्वच्छ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जायला हवेत.
वाढत्या शहरीकरणाबरोबर आपल्याला नद्या, नाले, तलाव यांच्या स्वच्छतेची ठोस उपायोजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत. यामुळे माणसाच्या प्रगतीचा आणि पर्यावरणाचा समतोल असे दुहेरी उद्दिष्ट साधले जाईल.

सार्वजनिक खाजगी भागीदारी

शौचालयातून निर्माण होणार्‍या सांडपाण्याची साठवण आणि त्यावर प्रक्रिया हे काम खाजगी संस्थांना देता येईल. यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकेल. स्थानिक प्रशासन सांडपाणी निरिक्षण समितीच्या बरोबरीने नियंत्रक आणि सहायक म्हणून काम करेल.

पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन

  • पावसाळी पाणी वाहू न देणे
  • पावसाचे पाणी हे गोड्या पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे, म्हणून तो वाया न घालवता त्या पाण्याची साठवण करून ते वापरणे आणि भूजलाची पुनर्भरणा करणे महत्वाचे आहे.
  • प्रत्येक घरात आणि इमारतीत पावसाच पाणी साठवण्यास प्रोत्साहन
  • भूजलावर अवलंबून नैसर्गिक पाणीसाठा कमी करण्यापेक्षा, पावसाचे पाणी साठवून वापरणे ही पर्यावरणाला अनुकूल पद्धत आहे. ही प्रक्रिया प्रत्येक घरात आणि इमारतीत करण्यासारखी आहे. छपरावर पडणारे पावसाचे पाणी हे घरातल्या अनेक गोष्टींसाठी वापरता येईल. ऑस्ट्रेलियात पावसाचे पाणी कपडे धुण्यासाठी, शौचालयात आणि बागांमध्ये वापरले जाते ज्यामुळे घरगुती वापरासाठी लागणारे पालिकेच्या पाण्याची ४०% बचत होते.
  • भूजलाची पुनर्भरणा करणे
  • जर भूजलाची पुनर्भरणा होत नसेल तर दुष्काळात नद्या व विहिरींचे पाणी आटून जाईल. काही भागांत पाणी भूजलात जास्त प्रमाणात पाझरते. अशा भागांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
  • नैसर्गिक नाल्यांचा जास्तीत जास्त वापर करणे
  • नैसर्गिक नदीनाल्यांचे संवर्धन व त्यांचा वापर करायला हवा. नदी व नाल्यांचा परिसर वृक्षारोपणाद्वारे सुशोभित करता येईल. नाल्यांवरचे अतिक्रमण काढून नैसर्गिक मार्ग मोकळे करायला हवेत.
  • पावसाच्या पाण्याचे प्रदुषण थांबवणे
  • पावसाचे पाणी हे गोडे पाणी आहे. सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे वेगळी असावी, जेणे करून सांडपाण्यावर करायच्या प्रक्रियेच्या खर्चावर अतिरिक्त भार पडाणार नाही आणि गोड्या पाण्याचा वेगळा उपयोगही करणे शक्य होईल. नाले आणि नद्या वाहत्या राहतील.
  • नाले आणि गटारांची बांधकामे
  • रस्त्याच्या कडेला गटारे अशा पद्धतीने बांधावी की रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी आणि पावसाचे पाणी नैसर्गिक ओढ्यांना जाऊन मिळेल.

तळटीप


घनकचरा व्यवस्थापन

कचरा व्यवस्थापनातून कचर्‍याचा पुनर्वापर

आपण जसजशी भौतिक प्रगती करतो, तसतसं आपलं वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने आपण निर्माण केलेल्या कचर्‍याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. पण, तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कचरा हा योग्य पद्धतीने निकाली काढला गेला पाहिजे. सर्व कचरा हानिकारक नसतो. कचर्‍याचे अनेक प्रकार असतात. त्यातील मुख्य दोन प्रकार म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. असेंद्रिय कचरा अनेक पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. सेंद्रिय कचरा, प्रत्येक माणसाला उपयोगात आणणे सहज शक्य आहे. पण, या सगळ्यासाठी इच्छाशक्ती असणं अत्यावशक आहे. कचर्‍यागकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे.

प्रश्नाचं स्वरूप


घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी वस्तूंचा साठा. आपली घरे, कार्यालये, दुकाने, भाजी मंडया, उपहार गृहे, सार्वजनिक संस्था, औद्योगिक संस्था, रुग्णालये, शेती, बांधकामे या सर्व ठिकाणांहून अनेक वेगवेगळ्या प्रकारचा कचरा रोजच्या रोज तयार होत असतो. आपण आपल्या घरातल्या टाकाऊ वस्तू, कचरा सरळ घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, नाल्यांमध्ये, समुद्र - नद्यांमध्ये अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.
महाराष्ट्रात एका वर्षात अंदाजे ९३ लाख टन कचरा तयार होतो (महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस दर दिवसाला अंदाजे ०.१४ ते ०.६३ किलो कचरा करतो). त्यापैकी ७५ लाख टन घनकचरा (सुमारे ८०%) हा नगरपालिका क्षेत्रांत तयार होतो. म्हणजेच वर्षाला सुमारे ९३००० मालगाडीचे डबे भरतील एवढा कचरा महाराष्ट्रात तयार होतो. या ९३००० डब्यांपैकी ७५००० डबे शहरांमधल्या कचर्‍याचेच असतात!! हा सर्व कचरा केवळ मुख्य करून शहरांमध्ये तयार होणारा आहे. याशिवाय महाराष्ट्रात दरवर्षी इतर प्रकारचा कचराही निर्माण होतो (पहा तक्ता क्र. १).
तक्ता क्र. १ – महाराष्ट्र राज्यात दरवर्षी निर्माण होणारा इतर कचरा
इतर प्रकारचा कचरादरवर्षी (लाख टन)
घरगुती कचरा७५
विषारी (Hazardous) कचरा१८
दवाखान्यांमधला कचरा०.११
इ-कचरा०.२०
एकूण कचरा९३.३१
महाराष्ट्रात दरवर्षी एकूण १८ लाख टन विषारी कचरा तयार होतो. हा कचरा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तयार होतो, उदा. रासायनिक, पेट्रोकेमिकल, कागद तयार करणारे, चामड्याचे व इतर कारखाने.
विभागविषारी कचरा (लाख टन)
अमरावती०.०६९
कोल्हापूर०.५९
चंद्रपूर०.८५
नागपूर०.८८
नाशिक१.०१
औरंगाबाद१.३२
नवी मुंबई१.४२
पुणे१.५१
ठाणे१.५८
रायगड२.५५
कल्याण२.६१
मुंबई३.६६
एकूण१८.०५
जुने टी.व्ही., म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ, मोबाईल, ओव्हन, कम्प्यूटर, प्रिंटर, मोबाईल आणि लॅपटॉपच्या बॅटर्‍या इत्यादी वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये समावेश होतो. या कचर्‍यात शिसं, बेरिलिअम, पारा, कॅडमिअम अशा अपायकारक जड धातू असल्याने तो अतिशय घातक असतो. युनायटेड नेशन्सच्या इ-कचरा समस्या निर्मूलन कार्यक्रमानुसार इलेक्ट्रॉनिक कचर्‍या त पिरियॉडिक तक्त्यातील ६० घटक असतात
भारतात ४.५० लाख टन इ-कचरा तयार होतो. यापैकी ७०% इ- कचरा हा १० राज्यात तयार होतो. या १० राज्यांमध्ये महाराष्ट्र (२०,२७० टन) राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात बृहन मुंबईत ११,०१७.०६ टन, नवी मुंबईत ६४६.४८ टन, पुण्यात २५८४.२१ टन तर पिंपरी-चिंचवड मध्ये १३२.३७ टन इ-कचरा तयार होतो. इ-कचरा हा प्रामुख्याने उद्योग क्षेत्रामध्ये तयार होत असला तरीही, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या घरगुती वापरामुळे तिथून तयार होणार्‍या कचर्‍याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढत आहे .
या कचर्‍याची हाताळणी आणि विल्हेवाट लावणं ही दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चालली आहे. या इ- कचर्‍यात विविध प्रकारचे धातू आणि अॅसिडिक गुणधर्म असलेले पदार्थ असल्याने ते जाळल्यास त्यातून होणार्याी उत्सर्जनामुळे मोठा धोका निर्माण होतो. हा इ-कचरा जमिनीत गाडणं किंवा जाळून टाकणं पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरतं. सर्वात चिंतेची बाब म्हणजे राज्यातला हा इ-कचरा अजूनही भंगारवालेच खरेदी करतात; ज्यांच्याकडे वैज्ञानिक पध्दतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही.
शहरातून गोळा होणारा कचरा आपण लांब कुठेतरी नेऊन पुरतो किंवा फेकतो आणि तिथे कचर्‍याचे डोंगर रचतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या-मोठ्या शहरांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दूरवर पसरलेले प्लास्टिक व कचर्‍यानचे डोंगर आपल्याला पहायला मिळतात. वर्गीकरण न करता, कुठलीही प्रक्रिया न करता अशा प्रकारे टाकलेला कचरा हा सर्वच दृष्टीने हानिकारक असतो. उदाहरणच पहा. पुणे-सोलापूर महामार्गावरच्या उरळी कांचन या गावात पुणे शहरातला सगळा कचरा पुरेशा प्रक्रियेविना व योग्य व्यवस्थापनाविना टाकला जातो. गेल्या २० वर्षांत तयार झालेल्या कचर्‍याच्या डोंगरांमुळे गावात दुर्गंधी, माशा-डासांचे साम्राज्य, कचर्‍यातून पाझरणार्‍या पाण्यामुळे दूषित बनलेले भूजल, विहिरी-बोअर वेल्सचे खराब पाणी आणि त्यामुळे सतत उद्भवणार्‍या आरोग्याच्या समस्या यांनी गंभीर रूप धारण केले आहे.
आपल्या आसपास तयार होणार्‍या बहुतांश कचर्‍यावर प्रक्रिया करून तो पुन्हा उपयोगात आणला जाऊ शकतो; परंतु अजूनही आपल्याला याचे गांभीर्य नसल्याने आपण कचरा वेगवेगळा करण्यासारखी साधी गोष्ट देखील करत नाही. कचर्‍या चे वर्गीकरण न केल्यामुळे त्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवता येत नाही व पुनर्वापर करण्याजोगे बरेच काही वाया जाते. वर्गवारी न केलेला कचरा (कचराकुंड्यांमधला व घराघरातून गोळा केलेला) अखेरीस शहराच्या बाहेर उघड्यावर (कचरा डेपोमध्ये) टाकला जातो, ज्यामुळे आजूबाजूचा परिसर गलिच्छ होतो. उघड्यावर टाकलेला कचरा तिथेच कुजतो, त्यातून दुर्गंधी सुटते व रोगराई पसरते.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यांमुळे तयार होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण व प्रकार वाढत जातात आणि वेगवेगळया समस्या निर्माण होतात. अस्वच्छता, आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न त्यातूनच निर्माण होतात. कचर्‍या ची विल्हेवाट लावायची सर्वांत सोपी व स्वस्त पद्धत म्हणजे तो पुरणे किंवा उघड्यावर जाळणे. पण त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. उघड्यावर जाळल्यामुळे किंवा अशास्त्रीय पद्धतीने पुरल्यामुळे हवा, भूजल आणि माती दूषित होते. समुद्र किनारी वसलेल्या मुंबई शहराचा कचरा खाड्यांमध्ये टाकला जातो (पहा फोटो क्र. १ व २).
Photo 1 – पुणे शहरात कचराकुंडी भरून वाहताना
Photo 2 – मुंबईच्या किनारपट्टीवर टाकलेला कचरा
भविष्यात वाढत जाणारा कचरा आणि त्यामुळे होणारे एकूणच परिणाम पाहता कचर्‍याच्या समस्येकडे आपण प्राधान्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण नदी-नाल्यांमध्ये जो कचरा टाकून देतो तो पुढे हळूहळू समुद्र व नंतर महासागरामध्ये जाऊन मिळतो. समुद्रात वरवर आपल्याला दिसत नसले तरीही हे कचर्‍याचे ढीग समुद्रात खोलवर जाऊन बसलेले असतात. त्यामुळे नेमका किती कचरा समुद्रात आणि महासागरात आहे याची निश्चित माहिती आपल्याला कधीच मिळत नाही.
आपण माणसांनी कचर्‍यात प्लॅस्टिक टाकल्यामुळे प्राण्यांना किती हानी पोचते याचे गांभीर्य आपल्याला अजूनही नाही. फेब्रुवारी २०१४ केरळ मधल्या साबरीमाला वनक्षेत्रात हत्तीणीने प्लॅस्टिक खाल्यामुळे आपले प्राण गमावले. या हत्तीणीच्या पोटाच्या आतड्यात प्लॅस्टिक पिशव्या व धातूपत्रे सापडले . या हत्तीणीने नुकतेच एका पिल्लाला जन्म दिला होता.
कचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचरा एकत्रित जमा करून त्याची जाळून किंवा पुरून विल्हेवाट लावणे नव्हे. कचरा व्यवस्थापन म्हणजे कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण, त्यानुसार त्याचा पुनर्वापर किंवा त्यावर प्रक्रिया करून योग्य रित्या त्याची विल्हेवाट लावणे. या बाबतीत शासनाने नियम बनवले आहेत, ते अत्यंत योग्य आहेत. नागरी घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, २००० नुसार कचर्‍याचे वर्गीकरण करणे आहे आणि उघड्यावर कचरा टाकण्यास (प्रामुख्याने वस्तीच्या जवळ) बंदी आहे. असं असलं तरी राज्यातल्या सर्व शहरांमध्ये आणि गावांमध्येही कचर्‍याची समस्या आज प्रमाणाबाहेर वाढते आहे.

असं का होतं?


घनकचर्‍याच्या समस्येला सामोरे जाण्यास जरी आपला कायदा सुयोग्य असला तरी खरी अडचण अंमलबजावणीची आहे. कचर्‍याच्या समस्येला आपण नागरिकही तितकेच जबाबदार आहोत हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, चॉकलेट खाऊन ते गुंडाळलेला कागद तिथेच फेकू नये, पाणी पिऊन झाल्यावर बाटली गाडीच्या खिडकीतून भिरकाऊन देऊ नये, या साध्या बाबी आपण लक्षात ठेवत नाही, तसे वळण आणि शिस्त आपल्या मुलांना लावत नाही. आपण निष्काळजीपणे वस्तू टाकून देतो आणि विसरून जातो. आपला परिसर म्हणजे कचरा टाकण्याचे ठिकाण आहे असंच आपण समजतो.
एके बाजूला आपण निर्माण करत असलेल्या कचर्‍याची नीट विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपण घेत नाही, तर दुसर्‍या बाजूला आपला वस्तूंकडे बघण्याचा दुष्टिकोनच बदलतो आहे. आज बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, त्या विकत घेऊ शकण्याची आपली क्षमताही वाढली आहे. पण त्यासोबत जबाबदारी येते हे आपण लक्षात घेतलेले नाही. एखादी वस्तू विकत घेताना आपल्याला त्याचा नक्की उपयोग आहे की नाही हे न पाहता आपण नव-नवीन वस्तू घेत राहतो. एखाद्या वस्तूची आपल्याला खरच गरज आहे का हे न तपासल्याशिवाय आपण पटकन ती घेऊन टाकतो.
वाढती लोकसंख्या व आर्थिक परिस्थिती त्याच बरोबर रोजगार, वैयक्तीक मिळकत, पुन्हा उपयोगात आणण्यासाठी प्रक्रिया करता येण्यासारख्या वस्तूंचे महत्त्व, व्यवस्थापन यंत्रणेची किंमत, इतर अशा अनेक गोष्टी घनकचरा निर्मितीवर परिणाम करतात. आपली जीवनशैली व गोष्टी उपभोगण्याची पद्धतच घन कचर्‍या चे प्रमाण वाढण्याला कारणीभूत ठरते. आजच्या उपभोक्तावादी समाजामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिन कचरा वाढीचे प्रमाण लोकसंख्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अधिक गतीने वाढत आहे आणि ते वाढत्या वैयक्तिक मिळकती बरोबर आणखी वाढेल अशी चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात दर दिवशी २०,५०० टन हून अधिक घनकचरा निर्माण होतो. यापैकी ५०% मुख्य शहरांमधून (मुंबई, ठाणे आणि पुणे) निर्माण होतो. मुंबईमधून प्रत्येक दिवशी ६५०० टन घनकचरा तयार होतो, त्यानंतर पुणे (१७५० टन प्रति दिवशी) आणि ठाणे (१२०० टन प्रति दिवशी).
महाराष्ट्रतील घनकचर्‍याची समस्या ही फार मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. हा घनकचरा सर्वत्र परिसरात आणि अधिवासात पसरला आहे आणि तो साफ करणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. असक्षम व्यवस्थापनामुळे आधीच प्रदूषित झालेल्या पाणी आणि मातीमध्ये सुधारणा करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. असक्षम व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाबद्दल असलेल्या बेफिकीर दृष्टिकोनाचा परिणाम पर्यावरणाच्या दर्जावर व सावर्जनिक स्वास्थ्यावर होतो आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान, खालवलेले पर्यावरण व सार्वजनिक स्वास्थ्याचा आजचा दर्जा धोकादायक परिस्थितीच्या वरचा आहे!

काय करायला हवं?


कचरा हा दुसर्‍या कोणाची तरी समस्या आहे असे म्हणून चालणार नाही. आपण निर्माण करणार्यार कचर्‍यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जागृती, राजकीय इच्छाशक्ती व प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
सर्वप्रथम म्हणजे कचरा करण्याचे प्रमाणच मुळात कमी करता येते का हे पाहायला हवे. आपण वापरत असलेल्या वस्तू कमी करू शकतो का? केवळ जुनी झाली म्हणून ती वस्तू टाकायची हे आपण टाळू शकतो का? ती टाकायच्या पूर्वी आपणच तिचा पुनर्वापर करू शकतो का? असा विचार आपण सर्वांनीच करायला हवा आहे. तसेच उत्पादन कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. लांब पल्याचे उत्पादन खर्चाचे गणित पाहता, उत्पादकांना त्यांची वापरून झालेली उत्पादने ग्राहकांकडून परत घेणे हे फायद्याचेच ठरते. उदाहरण- वापरून संपलेल्या खाद्यतेलाच्या पत्र्याचे डबे हे उत्पादन कंपनी ग्राहकांकडून परत घेते व नवीन खरेदीवर काही रकमेची सूटही देते. असे सर्वच उत्पादनांच्या बाबतीत व्हायला पाहिजे.
असा विचार करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे आज आपण लक्षात घेतले पाहिजे.
प्रत्येकाने स्वत:च्या परिसरात निर्माण होणार्‍या घन कचर्‍या चे प्रमाण कमीत कमी करण्याचे प्रयत्न करायलाच हवेत. त्या पुढची पायरी म्हणजे नागरिकांनी कचर्‍याणचे वर्गीकरण चार प्रकारात करावे असे अपेक्षित आहे. रिसाइकलेबल (पुन्हा प्रक्रिया करता येण्यासारखा), रियुसेबल (आहे त्याच स्वरूपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरता येईल असा), बायोडिग्रेडेबल (विघटन होणारा) आणि प्रक्रिया न करता येण्याजोगा कचरा. असे वर्गीकरण केल्यावर विघटन होणार्याब कचर्‍या वर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून वापर करण्याची जबाबदारीही आता नागरिकांचीच आहे, ती आपण उचलायला हवी.
निवासी भागांमध्ये त्या-त्या ठिकाणी कचर्‍याआच्या वर्गीकरण करणे आणि जैविक कचर्‍याचे विघटन करणे यासाठी तिथल्याच लोकांना सहभागी करून घेऊन कचर्‍याआचे व्यवस्थापन करण्याचे कार्यक्रम राबविले जाणे गरजेचे आहे.
प्रक्रिया करून पुन्हा वापरता येईल असा किंवा पुन्हा तसाच वापरता येईल असा कचरा उचलणारे आणि तो संबंधित यंत्रणेकडे पाठवून तो परत एकदा वापरात आणणारे अनेक उद्योग आज आपल्याकडे आहेत. कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, 'स्वच्छ' सारख्या संस्था यात मोलाची कामगिरी बजावतात. बाजारात असलेल्या प्रत्येक वस्तूतून जे काही वाचवण्याजोगे आहे ते पुन्हा उपयोगात आणण्याचे काम या संस्था करतात. अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि कचरा वर्गीकरणापासून ते त्यावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांपर्यंतच्या विविध संस्था-उद्योगांची साखळी ठिकठिकाणी निर्माण होईल म्हणून अशा संस्था-उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
थोडक्यात,
  • कचरा कमी करायला हवा, तो कमी करण्याचे सर्व मार्ग शोधायला हवे, अवलंबायला हवे
  • टाकाऊ गोष्टींचा जास्तीतजास्त वापर आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करायला हवी.
  • घरांघरांमध्ये आपापल्या कचर्‍या,चा बंदोबस्त कसा केला पाहिजे याबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देऊन, लोकांचा सहभाग वाढवायला हवा.
  • प्रत्येक घराला कचरा व्यवस्थापनेच्या रचनेशी जोडायला हवे.
  • कचरा व्यवस्थापन करणार्यास कर्मचार्यांरना सुरक्षित व आरोग्याला हितकारक अशा सुविधा पुरवायला हव्यात.
  • कचरा व्यवस्थपनासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.

महत्वाच्या कल्पना


  • कचर्‍यातून वीजनिर्मिती, खतनिर्मिती उद्योगांना चालना
  • उर्वरित कचरा खड्ड्यांमध्ये न पुरता शास्त्रीयरित्या जाळून राख
  • कचरा व्यवस्थापन खाजगी कंपन्यांकडून
  • ग्राहकांनी वापरून परत केलेल्या वस्तूंची पुनर्प्रक्रिया करण्यासाठी त्या त्या उत्पादन कंपन्यांची स्वतःची व्यवस्था

कार्यक्रम


कचरा जिथे निर्माण होतो तिथेच त्याचे वर्गीकरण

घन कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचे वर्गीकरण झाले पाहिजे. प्रत्येक घर, उद्योग, संस्था (शाळा, महविद्यालय, देऊळ, तीर्थक्षेत्र, उपहारगृहे, इत्यादी) या प्रत्येकाने जैविक कचर्‍या ची विल्हेवाट आपापली लावली पाहिजे व इतर कचर्‍यातच्या वर्गीकरणाची जवाबदरीही घेतली पाहिजे.
शालेय संस्था आणि संघटनांच्या मदतीने घन घन कचर्‍या च्या वर्गीकरणाबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी छोटो-छोटे उपक्रम राबवले जावेत. कचर्‍यावमधला फरक सांगणारी पत्रके वाटली जावीत. जैविक कचरा सोडून इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्य रित्या विल्हेवाटीसाठी गोळा केला जावा.

विकेंद्रीत घन कचरा व्यवस्थापन

जैविक कचरा वगळता इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्यरित्या विल्हेवाटीसाठी खासगी कंपनीकडून गोळा केला जाईल.
संपूर्ण शहराचा किंवा गावाचा घनकचरा एकत्र गोळा करण्यापेक्षा त्याची अनेक छोट्या-छोट्या केंद्रांवर विल्हेवाट लावणं अधिक उपयुक्त ठरेल. एखाद्या वॉर्डमध्ये जमा होणारा अजैविक कचरा शहराच्या बाहेर टाकण्यापेक्षा त्याची त्याच वॉर्डमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून विल्हेवाट लावली जावी. जैविक कचरा त्याच वॉर्डमधल्या एखाद्या सार्वजनिक बागेमध्ये त्याचे कंपोस्ट करून वापरता येईल. त्यातून तयार झालेले खत विकताही येईल. वॉर्डमधली भाजी मंडई, उपहारगृहे, इत्यादींचा जैविक कचरा खासगी कंत्राटाद्वारे उपयोगात आणण्यात येईल. यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच काही हानिकारक कचरा गोळा करण्याची वेगळी सोय केली जाईल. या सर्वांवर लक्ष, स्थानिक कचरा व्यवस्थापन विभागाची शाखा ठेवेल.
ज्या भाजी मंडया, उपहारगृहे, हॉटेल्स, कारखाने कचरा नियोजन कंपनीकडे नियमित कचरा देत असतील, त्यांना स्वच्छता करामध्ये सूट.
हे सर्व काम खासगी कंपन्यांच्या मदतीने केले जाईल

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग

हा विभाग विकेंद्री स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग असेल. या विभागामध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ आणि अभियंता कार्यभार चालवतील.
कचरा व्यवस्थापनामध्ये प्रायोगिक, अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष शास्त्रज्ञ आणि अभियंता यांची मदत घेतली जाईल. जैविक कचर्‍याकचे कंपोस्ट करून खत विकण्यात येईल. शहरांमधल्या सर्व भाजी मंडया, धान्य बाजार, उपहारगृहे व कचरा व्यवस्थापन करणारी खाजगी कंपनी एकत्रितरित्या फायदेशीर कार्यक्रम राबवतील. यातून अनेक कचरा नियोजनाच्या नवीन पद्धती उदयास येतील.

प्रदुषकांना दंड

शहर महापालिकेची कचरा नियोजनासंबंधीची कडक नियमावली असेल. पर्यावरण प्रदूषण करणार्या किंवा धोकादायक कचर्‍या साठी कारणीभूत असलेल्या संस्थाना (औद्योगिक, व्यवसायिक) दंड आकारण्यात येईल.

नव्या पद्धतीचे कचरा डेपो

कितीही प्रक्रिया केल्या तरी काही प्रमाणात, काहीच प्रक्रिया करु न शकता येणारा कचरा हा उरतोच. त्या कचर्‍या ची विल्हेवाट शक्यतो शास्त्रीय पद्धतीने जाळून करण्यात येईल. कचरा जाळणे शक्य नसेल तेव्हाच तो कचराडेपोमध्ये पुरला जाईल. पण सध्याच्या अशास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या कचरा डेपोंच्या ऐवजी नवे, शास्त्रीय पद्धतीचे कचरा डेपो बांधायला हवेत, ज्यामुळे आजूबाजूचा परिसरावर होणारा विपरीत परिणाम होणार नाही. मात्र कचरा डेपो हा शेवटचा पर्याय असेल.

तळटीप


Pages

My Blog List