Friday, August 26, 2016

सुखी, आनंदी, समाधानी महाराष्ट्र!

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची काळजी करणारे शासन

महाराष्ट्रानं मोठं स्वप्न नक्कीच पहायला पाहिजे. जगाच्या प्रगत समाजांच्या तुलनेत महाराष्ट्रानं देखील प्रगती करायला पाहिजे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र झाला पाहिजे. तसं करायचं तर आपल्याला महाराष्ट्रातील लोकांच्या अगदी प्राथमिक गरजांकडेही अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं. प्राथमिक गरजा म्हणजे पुरेसं खाणं, प्यायला शुद्ध पाणी, रहायला घर, शिक्षण, आरोग्य ह्यासारख्या गरजा.
मराठी माणसाच्या ह्या गरजा आधी भागल्या पाहिजेत त्यानंतरच आपण सर्वांचा "टिकाऊ विकास" साधू शकू. आणि समृद्धीपर्यंतची वाटचाल करू शकू
ते कसं करायचं, ते करताना शासनाची भूमिका काय असावी याविषयी या विभागात जरूर वाचा.

No comments:

Post a Comment

Pages

My Blog List